Ad will apear here
Next
कोविड-१९ : विश्व मराठी परिषदेतर्फे कथा, कविता लेखन स्पर्धा; रोख बक्षिसे
पुणे : करोना या विषाणूमुळे पसरलेल्या कोविड-१९ या अभूतपूर्व महामारीमुळे जगभर हाहाकार माजला आहे. या परिस्थितीशी दोन हात करता करता अनेक हात हे अनुभव कथा-कवितेच्या रूपाने शब्दबद्धही करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्व मराठी परिषदेने जगभरातील मराठी भाषकांसाठी कथा-कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार असून, स्पर्धेतील साहित्याचे पुस्तकरूपाने प्रकाशनही केले जाणार आहे.

कोविड-१९ या अभूतपूर्व महाविध्वंसक महामारीने माणसाच्या वाट्याला आलेली हतबुद्धता, हताशा आणि सार्वजनिक सुन्नता या पार्श्वभूमीवरही जगभर माणसे विविध मार्गांनी सभोवतालच्या परिस्थितीशी झुंजत आहेत, मार्ग काढायचा प्रयत्न करीत आहेत, शोध लावत आहेत, संशोधने करीत आहेत, एकमेकांना साह्य करत आहेत. माणुसकीचे अभूतपूर्व दर्शन घडविणाऱ्या, करुणेचा महापूर निर्माण करणाऱ्या, असामान्य धैर्याचे दर्शन घडवत आहेत. संयम आणि शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या घटनांसोबतच काही अवांछित व असंवेदनशील मनांचे दर्शन घडविणाऱ्या घटनाही घडत आहेत. डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस यंत्रणा, सरकारी अधिकारी हे व असे विविध गट जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. एका बाजूला या घटना करुणरसाचे दर्शन घडविणाऱ्या, तर दुसरीकडे मूर्तिमंत क्रौर्याचेही दर्शन घडते आहे. माणसाला हलवून सोडणारे हे वास्तव आहे. अतिशय अस्वस्थ करणारेही आहे. मानवी व्यवहारांचे, भावभावनांचे, त्यांच्याकडून अंतर्मनातील बऱ्या वाईट कोलाहलांचे, विकारांचे, विकृतींचे आणि त्याचबरोबर सद्गुणांचे, चिरंतन नैतिक मूल्यांचे, अंगभूत माणुसकीचे जे दर्शनही या निमित्ताने घडत आहे, ते आपल्या सभोवतालचे हे वास्तव कथा, कविता रूपात शब्दबद्धही होत आहे. ही अभिव्यक्ती प्रोत्साहित करण्यासाठी विश्व मराठी परिषदेने कथा, कविता लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. देश-विदेशातील मराठी भाषकांनी त्यांच्या रचना या स्पर्धेसाठी पाठविण्याचे आवाहन आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने प्रा. क्षितिज पाटुकले व अनिल कुलकर्णी यांनी केले आहे. 

भारतातील मराठी भाषक आणि भारताबाहेरील म्हणजेच विदेशातील मराठी भाषिक असे दोन स्वतंत्र गट या स्पर्धेसाठी करण्यात आले आहेत. याचे कारण म्हणजे कोविड-१९ युद्धात भारतातील आणि भारताबाहेरील परिस्थिती भिन्न आहे. विशेषत: अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये अभूतपूर्व, बिकट आणि आणिबाणीची परिस्थिती आहे. आखाती देश, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, जपान, दक्षिण-पूर्व आशियाई देश आणि आफ्रिकी समूहातील देश वेगवेगळ्या पद्धतीने स्थानिक परिस्थिती हाताळत आहेत. प्रत्येक देशातील स्थिती भिन्न आहे आणि व्यवस्थेचे प्रकार आणि अनुभव भिन्न आहेत.  साहजिकच तेथील आणि भारतातील अनुभवांमध्ये फरक असणार आहे. त्याचे प्रतिबिंब स्वतंत्रपणे दृष्टीक्षेपास यावे म्हणून दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत, असे प्रा. क्षितिज पाटुकले यांनी नमूद केले आहे. 

स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून, कथा, कविता युनिकोडमध्ये टाइप करून २८ मे २०२०पर्यंत sampark@vmparishad. org या ई-मेलवर पाठवायच्या आहेत. निवड झालेल्या लेखनाला रोख बक्षिसे दिली जाणार असून, सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. निवडक कथा आणि कवितांच्या संग्रहांची दोन स्वतंत्र पुस्तकेदेखील प्रसिद्ध केली जातील. 

बक्षिसे : भारतातील स्पर्धकांसाठी दोन्ही स्पर्धांकरिता स्वतंत्रपणे १८ बक्षिसे, तसेच विदेशातील स्पर्धकांसाठी दोन्ही स्पर्धांकरिता स्वतंत्रपणे प्रत्येकी १८ बक्षिसे देण्यात येणार आहेत. 

पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे तीन हजार रुपये, २१०० रुपये आणि १५०० रुपये बक्षीस दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येकी एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे आणि प्रत्येकी ५०० रुपयांची दहा विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. 

विनोद कुलकर्णी हे परीक्षण समितीचे समन्वयक असून, कथालेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रख्यात कथाकार भारत सासणे, मोनिका गजेंद्रगडकर, बबनराव पोतदार, नीलिमा बोरवणकर आणि कवितालेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजन लाखे, हिमांशू कुलकर्णी, म. भा. चव्हाण आणि अंजली कुलकर्णी यांनी सहकार्य देऊ केले आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी असून, स्पर्धेचे संयोजक म्हणून अनिल कुलकर्णी काम पाहणार आहेत. 

भारताबाहेर प्रचिती तलाठी (दुबई), अश्विन चौधरी (कॅनडा), निखिल कुलकर्णी (सॅन होजे-अमेरिका), विजय पाटील (अमेरिका), अर्जुन पुतलाजी (मॉरिशस), सुहास जोशी (ऑस्ट्रेलिया), नोहा मस्सील (इस्राएल), आणि संतोष कदम (ओमान) हे विश्व मराठी परिषदेचे प्रतिनिधी असतील. 

केवळ स्पर्धा घेणे एवढाच विश्व मराठी परिषदेचा मर्यादित उद्देश नसून, या निमित्ताने अखिल जगातील आणि भारतातील अशा संकटाच्या आणि कसोटीच्या क्षणी मराठी बांधवांच्या अंगभूत सामर्थ्याचा आणि सर्जनात्मक क्षमतेचा दस्तऐवज उपलब्ध व्हावा, हा मुख्य उद्देश आहे. देश-विदेशातील मराठी बांधवांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे संस्थापक-मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क :
वेबसाइट : vishwamarathiparishad.org 
प्रा. अनिकेत पाटील : 75072 07645
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZYVCM
Similar Posts
जगभरातील एक कोटी मराठी भाषकांचा आज कोविड-१९ महाजागर पुणे : कोविड-१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४२ देशांतून, अमेरिकेतील २१ राज्यांतून आणि महाराष्ट्रासह भारतातील १२ राज्यांतून एकाच वेळी अनेक मराठी भाषक एकत्र येत आहेत. २५ मे २०२० रोजी ते सोशल मीडियावर कोविड-१९च्या संबंधाने महाजागर करणार आहेत. विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या
विश्व मराठी संमेलनानिमित्त सात निःशुल्क लेखन (ऑनलाइन) कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये विश्व मराठी ऑनलाइन संमेलन आयोजित केले आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाइन लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
वैश्विक मराठी भाषकांचे पहिले ऑनलाइन संमेलन जानेवारीत विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशांतील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. त्या संमेलनाची माहिती देणारा हा लेख...
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language